ॐ असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मा अमृतं गमय
ॐ शांति: शांति: शांति:॥
उपनिषदामधील या सर्वांना परिचित शांतीपाठाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करुया. शब्दशः अर्थ अत्यंत सोपा आहे.
आम्हाला असत्याकडून सत्याकडे न्या,
(मिथ्या)अंधाराकडून (ज्ञानाच्या)प्रकाशाकडे न्या,
मृत्यूकडून अमरत्वाकडे (मोक्षाकडे) न्या.
शांती, शांती, शांती.
माझ्या गुरूंनी माझा करवून आणलेला या जीवनातला आणि पूर्व जन्मोजन्मीचा प्रवास असाच काही आहे. माझा दत्त संप्रदायाशी असलेला घनिष्ठ संबंधामुळे आणि दत्तगुरूंच्या कृपाशीर्वादाने त्यांनी या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने घडवून घेतलेली ही अप्रतिम कलाकृती म्हणजे दत्तात्रेय महासिद्धी यंत्र.
मूळ यंत्राची प्रतिकृती रेखाटताना अध्यात्मिक ऊर्जेच्या स्पंदनांनी मी भारावून गेले होते. हीच अनुभूती बाकीच्यांना पण येते का हे पाहण्यासाठी मी जेंव्हा हे दत्तात्रेय महासिध्दी यंत्र माझ्या आप्तेष्टांना दाखवले तेंव्हा त्यांनाही या यंत्राच्या ऊर्जेने प्रभावित केले. तुम्हालाही या दत्तात्रेय महासिद्धी यंत्राकडे पाहून ही ऊर्जा जाणवल्यास मलाही नक्की कळवा
– आकांक्षा चिटणीस – गुप्ते